बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

मुंबई | एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेईना. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातच नवाब मलिकांनी तर वानखेडेंवर आरोपांची मालिकाच लावली आहे. आता समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नीनं म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकरनं पत्रकार परिषद घेतली आहे.

क्रांती रेडकरनं पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. याशिवाय समीर वानखेडेंवर केले जाणारे आरोप खोटे असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष क्रांती रेडकरच्या पत्रकार परिषदेकडे असून हे प्रकण अजून तापलं आहे. नुकतंच नवाब मलिकांनी ट्विटरवर अज्ञात एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दिलेलं पत्र शेअर केलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

आता त्या एनसीबी अधिकाऱ्याच्या पत्रावरुन क्रांती रेडकरनं प्रत्युत्तर दिलं आहे. निनावी पत्र कुणीही लिहू शकतं, हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं समोर यावं. या आरोप करणाऱ्या व्यक्तीचा रिसर्च थोडा कमी पडला, आणखी थोडा रिसर्च करायला हवा होता, असं क्रांतीनं म्हटलं.

दरम्यान, हे पत्र खोटं असून याला काहीही आधार नाही. हे सगळे आरोप खोटे असून या पुराव्यांना काहीही अर्थ नाही. या आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात जाऊद्या म्हणजे खरं काय ते समोर येईल. समीरला याप्रकरणापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून ही सगळी कटकारस्थानं केली जात आहेत.

थोडक्यात बातम्या – 

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ लेटर बाॅम्बवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More