बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत! लोकांना घरातच राहण्याच्या सूचना

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही कोरोना नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यातच आता ज्या चीनमधून कोरोनाची सुरूवात झाली तिथे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरू केलं आहे.

बिजिंग शहरात कोरोनाचे नव्याने काही रूग्ण आढळल्याने कडक नियम लादण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना चाचण्यांच प्रमाण देखील वाढवण्यात आलं आहे. चीनप्रमाणेच रशियामध्येही कोरोनाचा विस्फोट झाल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात रशियात कोराेनाचे 37,678 रूग्ण आढळले आहेत. तर कोरोना मृतांचा आकडा 1075 इतका आहे. चीनमध्ये शनिवारी 38 नविन कोरोना रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये लोकांना घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

चीनची राजधानी बिजिंगमध्ये आढळलेले कोरोना रूग्ण निंग्शिया, शांक्सी आणि मंगोलियाच्या स्वायत्त भागातून प्रवास करून आले आहेत. गेल्या पाच दिवस प्रवास केल्याने हा कोरोनाचा पुन्हा प्रसार झाला आहे .यामुळे नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चीनच्या सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान, चीनपेक्षा रशियामध्ये जास्त विदारक परिस्थिती असल्याचं दिसतंय. शनिवारी 1075 रूग्णांचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रशियात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नोंदविण्यात आलेला मृत्युदर 33 टक्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीनुसार तब्बल 70 टक्क्यांची वाढ रशियामध्ये झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

थायरॉइडमुळे त्रस्त आहात?; आहारात करा ‘या’ 6 गोष्टींचा समावेश

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More