बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी धक्का, मग खळबळ अन् एकनाथ शिंदेंना हसू आवरेना – पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच आता शिवसेनेने डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. डोंबिवली येथे भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या तीन नगरसेवकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान एक भन्नाट प्रसंग घडला आहे. हा प्रसंग पाहून स्वत: एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरलं नाही. (Eknath Shinde did not stop smiling)

महेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, डोबिंवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यावेळी महेश पाटील यांनी प्रवेश करत असल्याचं जाहिर करताना चक्क मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असं म्हटलं. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. एकनाथ शिंदे यांनाही हसू आवरंण कठीण झालं. मग श्रीकांत शिंदे यांनी खुनावल्यानंतर महेश पाटील यांनी आपली चुक सुधारली.

महेश पाटील यावेळी बोलताना चुकून, श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामे सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत पाहून आहे. ती पाहून मी आणि माझे सहकारी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय असं बोलून गेले. मात्र तरीही महेश पाटलांना आपली चुक समजली नव्हती. मग जेव्हा श्रीकांत पाटील यांनी शिवसेना अशी आठवण करून दिली तेव्हा त्यांना त्यांची चुक समजली.

त्यानंतर, महेश पाटील यांनी माफी मागत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं म्हटलं आणि उपस्थितासंह ते स्वत:ही हसू लागले. दरम्यान, भाजपचे  महेश पाटील, सायली विचारे आणि सुनिता पाटील या तीन माजी नगरसेवकांसह इतर अनेक कार्यकर्त्यांनी  शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

मोदी सरकार ‘अॅक्शन मोड’वर ; आता ‘या’ गोष्टींवर मिळणार अनुदान

पोटावरची चरबी कमी करायचीय? मग ‘या’ 5 सवयी लावून घ्याच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More