आता महिलांना मिळणार मासिक पाळीच्या काळात हक्काची सुट्टी

नवी दिल्ली | मासिक पाळी (Menstrual cycle) स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होय. मासिक पाळी म्हणलं की अनेक स्त्रीयांच्या चेहऱ्यावर उदासी येतेच. अनेकदा त्या काळात होणार त्रास असहाय्य असतो. काही काम करण्याचं मन होत नाही. नोकरदार स्त्रीयांसाठी हा काळ अवघड असतो.

पोटात दुखणे,अशक्तपणा, उलटी, मळमळ यांसारखा त्रास होत असतानादेखील ऑफीस वर्कला (Office work) जावं लागत. काहींचा तर नाईलाज होतो. आता मात्र असं काही होणार नाही आहे. आता महिलांना मासिक पाळीच्या काळात हक्काची सुट्टी मिळणार आहे.

स्पेनच्या (Spain) संसदेने हा मोठा निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेता येणार आहे. मासिक पाळीच्या या काळात महिलांना पगारी रजा मिळणार आहे. स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरला आहे ज्यांन मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे,असं मत स्पेनच्या मंत्री इरेन मोंटेरो (Irene Montero) यांनी म्हटलं आहे. मासिक पाळीत पगारी रजा देण्याचा अधिकार या कायद्यामुळं महिलांना मिळाला असल्याचंही त्या पुढे म्हणाल्या. त्यामुळं आता स्पेनमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना आजारी रजा लागू करण्याचा अधिकार असणार आहे.

हा फायदा महिलांना कामाच्या ठिकाणी कलंकित करु शकतो असं मत स्पेनच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेनं मांडलं आहे. या गोष्टीमुळं त्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. दरम्यान, स्पॅनिश सोसायटी ऑफ गायनॅकाॅलाॅजी अँड ऑब्स्टेट्रिक्सच्या (Spanish Society of Gynecology and Obstetrics) मते मासिक पाळीच्या दिवसात सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. त्यामुळे स्पेनच्या संसदेनं हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-