बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि नामांकित उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणे आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणे हा आरोप करण्यात आला आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री गहना वशिष्ठने आपले मत सोशल मीडियावर मांडले आहे. गहनाने व्हिडीओ शेअर करत राज कुंद्राचं समर्थन केलं आहे. गहना म्हणाली की, कोणीही पॉर्न व्हिडीओ शूट केले नाहीत.  एकता कपूरच्या ‘गंदी बात’ आणि कित्येक चित्रपटांप्रमाणे हे काही व्हिडीओ आहेत. ज्यामध्ये बोल्ड कंटेंट असतात. मला असं वाटतं की, आधी तुम्ही ते व्हिडीओ बघा आणि मग ठरवा व्हिडीओ अश्लील आहेत की नाही.

18 वर्षांवरील सर्व लोक समजूतदार आहेत. तसेच ते अश्लील आणि एरोटिकामधील फरक समजू शकतात. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. ते नक्कीच सत्त्याची बाजू घेतील. त्यामुळे गोष्टींना चुकीचं दाखवू नका, कोणताच व्हिडीओ अश्लील नसून सामान्य बोल्ड आहे. उगाच काही लोकांना टार्गेट केलं जातंय. सत्य समजून घ्या, असं देखील गहना म्हणाली आहे.

दरम्यान, अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांच्या चौकशीतून धागेदोरे लागत राज कुंद्राची चौकशी करण्यात आली. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.

थोडक्यात बातम्या –

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

मोठी बातमी! नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल

इन्कम टॅक्सच्या तपासात धक्कादायक खुलासा, 256 पानटपरी, ठेलेवाले निघाले करोडपती!

राज कुंद्रासोबत आता अजिंक्य रहाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय आहे प्रकरण

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More