बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

ठाणे | ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज पहाटे ठाण्यातील राबोडी परिसरातील एका इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याचं समजतंय. या दुर्घटनेमुळे सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज पहाटे सहाच्या दरम्यान राबोडी परिसरात तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. अचानकपणे कोसळलेल्या या स्लॅबमुळे तीन रहिवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अचानकपणे घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाने घटनास्थळी धाव घेतली. खत्री बिल्डिंगमधील 75 कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलं.

दरम्यान, राबोडी परिसरात राहणाऱ्या या इमारतीतील रहिवाशांना महानगरपालिकेनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं अशी मागणी केली. सध्या या 75 जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सुरेखा पुणेकरांची राजकारणात एन्ट्री; ‘या’ पक्षाचा झेंडा घेणार हाती

‘गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार’; संजय राऊतांची मोठी घोषणा

धक्कादायक! कोरोनामुळे चार वर्षाच्या चिमुकलीचा झोपेतच मृत्यू

शरद पवार सहकुटुंब गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी!

‘सरकारचा गुंडाना धाक राहिला नाही’; श्वेता महाले यांनी सरकारला सुनावलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More