बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल”

नवी दिल्ली | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने टिकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राज्यात आता वेगळेचं वळण लागलेलं दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

नवाब मलिक हे राज्यात घाणरेडं राजकारण करत आहेत. त्यांनी आमचे वैयक्तिक बाबी, फोटो आणि कागदपत्रे सोशल मीडियावरून जाहीर केले आहेत. आता आमच्या संयमाचा बांध फुटत आहे. त्यामुळे आता आम्ही तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करू, असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे, असंही क्रांतीने म्हटलं आहे.

क्रांती रेडकरने जातीच्या दाखल्याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हे हिंदू आहेत, ते नाकारले जाऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी न्यायालयात जावं. सध्या ते खुप खालच्या पातळीवर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील क्रांती रेडकरने केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण राज्यात गाजत आहे. आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक हे सातत्याने चौकशीबाबत हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण या प्रकरणावरून चांगलंच तापलेलं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवणारच”

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा

रणबीर-आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार? शुटिंग थांबवल्याने चर्चांना उधाण

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More