बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात आता सरपंचांना मिळणार विमाकवच; ‘या’ जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

सिंधुदुर्ग | कोरोनाकाळामध्ये काम करणाऱ्या सरपंचांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मोठा दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना एक लाखांचं विमा कवच देण्याचा महत्त्वाचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट गेल्या दिड वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील 428 सरपंचांना विमा कवच दिले जाणार आहे.

कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व सरपंचांना कोरोनाची लागण होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी 15 सरपंचांना पॉलिसी देऊन या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या उपक्रमानुसार जिल्ह्यातील सरपंचांना 9 महिन्यांसाठी हे विमा कवच मिळणार असून देशातील कोणत्याही रूग्णालयात सरपंचांना कोरोनावर उपचार घेता येणार आहे. तसेच ही संकल्पना राबवणारी जिल्हा परिषद म्हणून सिंधुदुर्ग ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.

थोडक्यात बातम्या

रिलायन्सच्या 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लसीकरण!

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More