बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

मुंबई | सध्या चालू असलेल्या आयपीएल मॅचमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. मैदानावर जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे, तर स्टेडियममध्ये प्रेमाची झप्पी तसेच सोबत पप्पी देखील बघायला मिळाली. मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने मुंबई विरुद्ध राजस्थान सामना सुरु असताना त्याच्या बायकोला किस केलं. त्यांचा याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबईचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट झहीर खान यांची बायको अभिनेत्री सागरिका घाटगे हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्यकुमार यादव त्यांची पत्नी देविशा शेट्टीला किस करताना दिसून येत आहेत. मात्र त्या दोघांच्यामध्ये एक ग्लास आडवी आलेली आहे. हा अडथळा जरी येत असला तरी त्यांनी अडथळा पार करुन ग्लासच्या बाहेरुन किस केलं.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 14 व्या पर्वातील 24 वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात सूर्यकुमारने फारशी चमकदार खेळी केली नाही. मात्र त्यांच्या एका फोटोमुळे इंटरनेटवर फक्त त्यांचीच चर्चा बघायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत मुंबईने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. मुंबईने हे लक्ष्य 3 विकेट्स गमावून सहज पार केलं.

Picture Courtesy: Instagram/ Sagrika Ghatge Khan

थोडक्यात बातम्या-

रेमेडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम उघड; ‘या’ जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

गृह विलगीकरणात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी की नाही?; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक

खोट्या कारणाने ई-पास बनवणाऱ्यांनो सावधान; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

कोरोना ओसरण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार; तज्ज्ञांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More