बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटी बाप तो बापच पोराच्या जीवासाठी तब्बल 300 किमीचा सायकलवर प्रवास; डाॅक्टर म्हणाले होते…

बंगळुरू | कर्नाटकमधील म्हैसूर याठिकाणी मनाला स्पर्श करणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलांसाठी आईवडील कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यात प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाची बाजी लावताना देखील ते मागेपुढे पाहत नाहीत, याचा प्रत्यय आला म्हैसूरमधील कोप्पालू गावात.

कोप्पालू गावात मानसिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी 300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. 45 वर्षीय आनंद एक बांधकाम मजूर आहेत. त्यांनी त्यांच्या 10 वर्षीय मुलाच्या उपचारासाठी लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून बंगळुरु गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं.

‘माझा मुलगा मानसिकरीत्या कमजोर आहे. आहे. मला औषध आणायला सायकलनं जावं लागलं. मी जेव्हा बऱ्याच जणांना विचारलं माझ्याबरोबर येता का? तेव्हा चारचाकी, दुचाकी आणि ऑटोनेही येण्यास नकार दिला. मी म्हैसूरमध्ये बऱ्याच ठिकाणी औषध शोधलं. मात्र, ते फक्त नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स या ठिकाणी उपलब्ध होतं’, असं आनंद यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की, ‘डॉक्टरांनी मला सांगितलं जर हा एक डोस चुकला तर त्याला पुन्हा 18 वर्षे हा डोस द्यावा लागेल.’

दरम्यान, लॉकडाऊनमुळे त्यांची कोणत्याही टॅक्सी किंवा ऑटोवाल्यानं मदत केली नाही. मोटारसायकलवरूनही बंगळुरुमध्ये जाण्यास कुणी तयार झालं नाही. त्यामुळे त्यांना NIMHANS मध्ये सायकल चालवतच पोहोचावं लागलं. डॉक्टरांच्या मते त्यांचा मुलगा एकही डोस चुकवू शकत नाही. पण ते औषध म्हैसूरमध्ये उपलब्धच नसल्यानं सायकलनं त्यांना बंगळुरू गाठावं लागलं.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटीहून अधिक भारतीय बेरोजगार

तिने भररस्त्यात स्वत:चे कपडे फाडून घेत दिली धमकी, चिडलेल्या प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली- चंद्रकांत पाटील

लाॅकडाऊनमुळे कोरोनाच नाही तर अन्य आजारांपासूनही लोकांचे जीव वाचले; संशोधनातून माहिती समोर

कोणी माझी मदत करेल का?; नवरदेवाच्या फेसबुक पोस्टनं संपूर्ण प्रशासन खडबडून जागं झालं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More