बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”

पुणे | राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी चालू आहेत. केव्हाही काहीही होऊ शकतं. सरकार राहील न राहील शेवटी तुमचा आमदार मीच राहिन, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते पुण्यात विविध विकासकामाच्या उद्घाटनावेळी बोलत आहे.

गेले दोन वर्ष राज्यात कोरोनाचा काळ होता. त्यानंतर काही चांगली काम करता येतील असं वाटत होत, मात्र आता काहीही घडू शकतं सांगता येत नाही. आपण मंत्री असताना कधीच मोह केला नाही. कधीच रूबाब मिरवला नाही. मंत्री असताना प्रत्येक वाड्यावस्त्यात मी गेलो आहे, असंही ते या मेळ्यावात म्हणाले.

राज्यात शिंदे गटातील आमदारांच्या बंडानंतर राजकीय युद्ध आता कायद्यापर्यंत येऊन थांबला आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर राजकीय उलथापालथ झालीये. यामुळे आता महाविकास आघाडी टिकणार की जाणार याबद्दल कोडं पडलं आहे. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

राज्यपालाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आता ते सक्रिय झाले आहेत. यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोणती भूमिका घेणार आहेत यावर राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी अमित शहा मैदानात?, महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More