महाराष्ट्र मुंबई

कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोनाविरोधातील सामूहिक लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश मिळवून देईल, अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हिंदू इकॉनॉमिक फोरमच्यावतीने ‘कोविडपश्चात काळात भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर फडणवीसांचं व्याख्यान आज आयोजित करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे सर्वाधिक फटका अमूक एखाद्या क्षेत्राला बसेल, असं समजण्याचं काहीच कारण नाही. सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसणार आहे. पण त्याचवेळी अशी संकटं अनेक नवीन संधी सुद्धा निर्माण करत असतात. त्याकडं आपल्याला लक्ष केंद्रीत करावं लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हे एकमेव शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. हे ओळखून आपल्याला या परिस्थितीत जगण्याची सवय आता करून घ्यावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?- आशिष शेलार

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?

महत्वाच्या बातम्या-

वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

3 मे नंतर लॉकडाउनचं काय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

‘महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या’; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या