Top News पुणे महाराष्ट्र

पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!

पुणे | ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून लसीला आपतकालीन परवानगी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये लस पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

16 जानेवारीला लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या आरोग्यसेवक (हेल्थकेअर वर्कर्स) लाभार्थ्यांपैकी 55 टक्‍केच लाभार्थ्यांना पुरेल एवढी लस राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली असून, तेवढ्यांनाच ती लस देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

सुमारे साडेआठ लाख लाभार्थी असून, राज्यासाठी 9 लाख 63 हजार ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून तर 20 हजार ‘भारत बायोटेक’कडून लस उपलब्ध झाली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत नियोजित विभागांमध्ये लस पोहोचवली जाणार असून, तेथे जिल्ह्याच्या गाड्या येऊन त्या लस घेऊन जातील, असं डॉ. पाटील यांनी नमूद केलं.

तसंच, लस वितरणाचं नियोजन राज्याने केलं होतं. मात्र केंद्रानं जिल्हावार वितरणाचं नियोजन केल्यानं त्यांनी पाठवलेल्या यादीनुसारच ते होणार असल्याचं डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार’; वडेट्टीवारांनी हाय कमांडकडे केली ‘ही’ मागणी

उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन राऊत

सीरममधून पहिला कोविशिल्ड साठीचा पुरवठा मुंबईत दाखल!

‘धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या