Top News महाराष्ट्र मुंबई

पहिल्या टप्यात राज्यातील ‘इतक्या’ जनतेला लस देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | कोरोना रोगाचा कायमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व जनता लसीची प्रतीक्षा करत आहे. अशातच कोरोनावरील लस अंतिम टप्यात असून लवकरच लस उपलब्ध होणार असून राज्यसरकारने देखील कोरोना लसीकरणाची तयारी सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 3 कोटी लोकांना लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केंद्राने कलेल्या प्लॅनिंगनुसार राज्यातही ज्या तारखेला लस द्यायची आहे त्याचा मेसेज संबंधित व्यक्तीला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवूनच तिला लस दिली जाईल, असं टोपे यांनी लसीकरणाबाबत माहिती देताना सांगितलं.

टोपे म्हणाले की, “लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्पर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जात आहे.”

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजारांसाठी सरकारकडून खर्च दिला जातो. त्यात आता कारोना आजाराचाही समावेश करण्यात आला असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे

‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका

मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय सांताक्लॉज; भेट म्हणून देतो मास्क आणि सॅनिटायझर

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या