मुंबई | राज्यात जून-ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
राज्य सरकारने आज याच वचनाची पूर्तता केली असून अतिवृष्टीग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील मदत म्हणून 2 हजार 297 कोटी 6 लाख 27 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
पहिला हप्ता वितरित करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभाग यांच्याकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेती व बहुवार्षिक पीकांचे किमान 33 टक्के नुकसान अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पीकांसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टरच्या मर्यादा देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!
अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम
कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण जगासाठी मोठी बातमी!
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली, अन्…