बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अचानक फ्लाईटमध्ये कपलने सुरू केलंं किसिंग त्यानंतर एअरहोस्टेसने केलं असं काही की….

इस्लामाबाद | सार्वजनिक ठिकाणी आपण अनेकवेळा पाहिलं असेल काही कपल्स आजूबाजुच्या लोकांना न पाहता किस करतात. त्यांना काही भान रहात नाही मग शेवटी नागरिकच तिथून आपली वाट बदताना पाहिलं असेल. अनेकवेळा गार्डनमध्ये असे काही प्रसंग होतात मात्र एका कपलने फ्लाईटमध्येच किस घेण्यास सुरूवात केली. याबाबत ट्रिब्यूनने वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या कराचीहून इस्लामाबादला जाणाऱ्या फ्लाईट पीए 200 फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला. विमानात बसलेल्या इतर प्रवाशांनी सांगितलं की, विमानात चौथ्या रांगेत एक कपल बसलं होतं मात्र त्यांनी अचानक किस करायला सुरूवात केली. त्यांना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किस करताना पाहून अनेकांना धक्का बसला. इतर प्रवाशांनी केबिन क्रू सदस्यांकडे त्या दोघांची तक्रार केली.

त्यानंतर विमानातील एअरहोस्टेसने त्या कपलला सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवा, असं सांगितलं. मात्र तरीही त्यांनी आपलं किस करणं काही थांबवलं नाही. वारंवार सांगूनही कपल काही ऐकायला तयार नव्हतं. त्यावेळी एअरहोस्टेसने आयडिया केली. तिने किस करत असलेल्या कपलच्या अंगावर ब्लॅंकेट टाकलं. किमान इतर प्रवशांना त्रास होऊ नये म्हणून एअरहोस्टेसने अशा प्रकारची शक्कल केली.

दरम्यान,  विमानात प्रवास करणारे वकील फारूक अल्वी यांनी या प्रकरणात केबिन क्रूने कारवाई न केल्याबद्दल आणि या प्रकाराची एअरलाईन स्टाफकडे तक्रार न केल्यामुळे सिविल एव्हिएशन प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाचा निरोप

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More