अकोला | राज्यपाल हे घटनात्मकपद असल्यानं त्या पदावरील व्यक्तीच्या बोलण्याकडं सर्वांचं लक्ष असतं. देशातील सर्वाधिक गाजणाऱ्या राज्यपालांपैकी एक म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ओळखलं जातं. भगतसिंग कोश्यारी आपल्या आगळ्या-वेगळ्या वक्तव्यांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. आताही भगतसिंग कोश्यारी यांनी मुलींबाबत एक वक्तव्य केलं आहे ज्यावरून राज्यात वाद होण्याची शक्यता आहे.
अकोला येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या व्यासपीठावर कोश्यारी बोलत होतेय. सतत आपण म्हणतो की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असचं जर चालत राहील तर येणाऱ्या काळात मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यापालांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपल्याला समतोल विकास साधाण्यासाठी मुलगा-मुलगी दोन्हींना समान लेखण्याची गरज असल्याचंही भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत. भगतसिंग यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर मतं व्यक्त केली आहेत. भगतसिंग यांच्यावर या वक्तव्यावरून सर्वस्तरातून जोरदार टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वीच राहूरीमध्ये बोलताना जोरदार फटकेबाजी केली होती. राज्यपालांच्या अनेक वक्तव्यावरून राज्यात सत्तधारी पक्षात आणि त्यांच्यात शाब्दिक वाद शितयुद्ध रंगलेलं पहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या
‘आता तरी सरकारला जाग येणार का?’;’त्या’ घटनेवरून प्रविण दरेकरांचा संताप्त सवाल
“चीनवर बोलणारे सर्वज्ञानी संजय राऊत पंढरपूरवर गप्प का?”
सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव
“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”
“कलेक्टर आहे ‘तो’ शिवसेनेचा, सगळ्यांचे पैसे गोळा करतो”
Comments are closed.