बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

नवी दिल्ली | कोरोनाच्य दुसऱ्या लाटेने देशभरात हैदोस घातला होता. या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. तर काही तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. अशातच देशातील केरळमध्ये तिसरी लाट आल्यासारखं चित्र आहे.

केरळमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 28 जून रोजी 96,012 होती, जी 7 जुलै रोजी 1.08 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यासोबतच 5 जुलैपासून सक्रिय रुग्णसंख्येत तब्बल 7,300 ची वाढ झाल्याचं केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे. केरळमध्ये जवळजवळ सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 10 दिवसात तब्बल 12,000 संख्येने वाढ झाली आहे.

केरळमधील एकूण कोविड रुग्णसंख्या 2 महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाली आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 28 जूनपासून राज्यात किमान 1119 मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, 6 मे रोजी राज्यात मृतांची संख्या 6,339 होती, ती 16 जूनला 11,508 पर्यंत पोहोचली. सध्या मृतांचा आकडा 14,108 इतका आहे. काही तज्ज्ञांनी केरळमधील रुग्णसंख्या वाढ म्हणजे कोरोना महासाथीची तिसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशवासियांनी गहाळ न राहता काळजी घेतली पाहिजे.

थोडक्यात बातम्या-  

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ नव्या विषाणूचा होतोय शिरकाव

कौतुकास्पद! कोरोना संकटात ‘या’ शाळा मालकांनी 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी केली माफ

“…आता मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरावी लागणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More