बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले

सोलापूर | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर शहरात मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु, आता हा आकडा कमी होत असताना पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 55 हजार 100 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच 1 लाख 47 हजार 299 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल 4 हजार 136 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात दिवसभरात फक्त 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये 331 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात 24 तासात 18 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी होत असल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More