बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेगवेगळ्या दुर्घटनेत मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल इतक्या निष्पाप नागरिकांचा बळी

मुंबई |  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली आहे. त्यातच शनिवारी रात्रीपासुन मुंबईत धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच मुंबईसह उपनगरात काही दुर्घटनादेखिल घडल्या.

दरम्यान, चेंबुर वाशीनाका परिसरातील डोंगराळ भागात असणाऱ्या काही घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने काल 21 जणांना नाहक आपला जिव गमवावा लागला आहे. तसेच विक्रोळी व भांडुपमध्ये दरड कोसळल्याने 11 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  एकुणच गेल्या 24 तासात मुंबईत विविध दुर्घटनेत 33 निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चेंबुर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यातच विरोधकांनी सरकारला या प्रकरणात दोषी धरून टीकाटीप्पनी करायला सुरुवात केली आहे. तसेच नगरविकास विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

येत्या 3 ते 4 दिवसात मुंबईसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री यांनी काल महत्वाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक घेऊन त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘…म्हणून ईशानने पहिल्याच चेंडूवर ठोकला षटकार’; ईशानच्या सिक्सरचं ड्रेसिंग रूम कनेक्शन

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More