बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

डेहरादून | उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर संपूर्ण देशाचंच लक्ष लागून असतं. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणं नेहमीच औत्सुक्याचं ठरतं. परंतु गेली 70 वर्ष उत्तराखंड मधील गंगोत्री विधानसभा मतदार संघाचा एक इतिहास आहे.

गंगोत्री मतदार संघात ज्या पक्षाचा आमदार निवडून येतो त्याच पक्षाची सत्ता उत्तराखंडमध्ये स्थापन होते. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील काही लोक या गोष्टीला एक चमत्कार समजतात तर काही लोक निव्वळ योगायोग. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ही गोष्ट घडत आहे.

पूर्वी हा मतदार संघ उत्तरकाशी म्हणून ओळखला जात होता. पुढे 2000 साली या मतदार संघाचे पुरोली, गंगोत्री आणि यमुनोत्री या तीन भागांत विभाजन झाले. परंतु 1952 सालापासून या मतदार संघात ज्या पक्षाचा आमदार निवडून येतो त्याच पक्षाची राज्यात सत्ता स्थापन होत आहे.

दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्यानं संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत गंगोत्री मतदार संघातून कोण निवडून येणार आणि कोणता पक्ष सत्ता स्थापन करू शकणार? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता पण…- छगन भुजबळ

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More