बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

उज्जैन | उज्जैनमधील नागदा गावात पती दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ सापडल्यामुळं त्याच्या बायकोनं दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली आहे. पती प्रेयसीसोबत असल्याचं कळताच तिने घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतलं. या प्रकारामुळं आजूबाजूला चांगलीच खळबळ उडाली होती. पण, घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर मात्र अनेकांसाठी हा चर्चेला चांगला विषय बनला. पोलीस आल्यानंतरही बायको त्या दोघांच्या अंगावर धावून जात होती. पोलिसांची नजर चुकवून तिनं पतीला काठीनं झोडपलं.

पती दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ सापडल्यानंतर पत्नीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वीच तिनं या दोघांनाही बेदम मारहाण केली. इतर नातेवाईकांनीही महिलेला यासाठी सहकार्य केलं. संबंधित पत्नी तिच्या बहिणीसोबत भारत कॉमर्समधील एका घरामध्ये आली. त्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं. मात्र, तिला मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे घरातच होते. बाहेरून कुलूप लावलेले पाहिल्यानंतर तिनं अगोदर पोलिसांना फोन लावला आणि घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलावलं.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी ठाणे एसआयीई योगिता उपाध्याय त्यांचे पथक घेऊन घटनास्थळी आल्या. पत्नीनं हे दोघे आत असल्याचं खात्रीपूर्वक सांगितल्यानंतर पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडले. पोलीस दोघांना बाहेर आणत असताना पत्नीनं दोघांनाही मारायला सुरू केली. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं की, अशाप्रकारे मारहाण करता येणार नाही. मात्र, तरीही त्यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत पहिल्यांदा पतीला, नंतर त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला.

दरम्यान, नागदा येथील बिर्लाग्राम भागात राहणार्‍या पत्नीनं सांगितलं की, माझा नवरा ग्रासिममध्ये काम करतो. कामावर असल्याचं सांगत दुपारी 2 वाजता तो घराबाहेर पडला. पण, कारखान्यात पोहोचण्याऐवजी तो प्रेयसीकडे गेला. इथे दोघांना खोलीत सोडत त्याच्या मित्रानी बाहेरुन कुलूप लावत निघून गेला होता. माझा पती मला त्याच्या प्रेयसीमुळं मारहाण करतो, असही संबधीत पत्नीनं सांगितलं. तरी, या घटनेबाबत अद्याप पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

थोडक्यात बातम्या –

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

कीडाप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ देशात पार पडणार आयपीएलचे उर्वरित सामने

डॉक्टर दाम्पत्याचा दिवसाढवळ्या भररस्यात गोळ्या घालून केला खून, पाहा व्हिडीओ

महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली अन्…; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More