बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हीही विरोधकांशी लढायचं ठरवलंय…, अर्जुनाप्रमाणे आम्हीही सर्व बाण परतवू – संजय राऊत

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआयनंतर ईडीने छापेमारी केली. यानंतर ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख उपस्थित राहिले नाहीत. यावरून विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्नभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सरकारबद्दल कुणालाही मार्ग बदलता येणार नाही. महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. त्याने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचं कथानक आहे. कधीही पांडवांनाच घेरलं जातं. कौरव अधर्माच्या बाजूने होते. कौरव हे असत्याचं प्रतिक आहे. सध्या सरकारलाही घेरलं गेलं आहे. श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सध्याचं सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधक असले तरी ते महाराष्ट्रातील आहेत. आपण एकमेकांना ओळखतो. त्यामुळे खोटे आरोप करणं बरं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. वडीलधारे आहेत. आमच्यात संशयाचं वातावरण नाही. आम्हीही विरोधकांशी लढायचं ठरवलंय, असं ठाम वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही गोष्टींचं स्मरण करून दिलं म्हणता. आम्हीही त्यांना स्मरण करून देत असतो. 12 आमदारांची यादी त्यांच्याकडे आहे. यादीचं आम्हीही त्यांना स्मरण करून देत असतो. त्यांना बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतात. फक्त यादीचंच विस्मरण होतं, असा टोला देखील त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

लोकांना लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी मंत्र्यांनी रांगेत उभं रहावं- नरेंद्र मोदी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More