बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या रंगदार सामन्यात अखेर भारताने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या संघाला केवळ 120 धावांवर बाद करत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अखेरच्या दिवशी भारत हा सामना हरेल की काय? अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीने आणि फलंदाजी करत आणि नंतर गोलंदाजीची धार दाखवत इंग्लंडचा दारूण पराभव केला.

या सामन्यात बरीच गरमागरमी झालेली पहायला मिळाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी 181 वर 6 गडी बाद अशा बिकट स्थितीत भारतीय संघ होता. त्यामुळे इंग्लंड पाचव्या दिवशी सहज जिंकेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, पाचव्या दिवशी रिषभ पंत बाद झाल्यानंतर जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीने भारताचा डाव सावरला. त्या दोघांनी 90 धावांची भागेदारी केली आणि भारताने सुटकेचा श्वास घेतला. याच वेळी मैदानात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भारताच्या डावातलं 92वं षटक चालू होतं. त्यावेळी मैदानात शमी आणि बुमराह फलंदाजी करत होते. इंग्लंडची लवकर फलंदाजी यावी यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेजिंग चालू केली. त्यावर बुमराह आणि शमीने आक्षेप घेतला आणि अंपायरला सांगितलं. त्यावर अंपायरने मार्क वूडला गप्प राहण्यास सांगितलं. त्यानंतर जाॅस बटलर आणि कर्णधार ज्यो रूटने मध्यस्ती केली. हा सर्व प्रकार भारतीय कर्णधार विराट कोहली बाल्कनीतून पाहत होता.

मार्क वूड गोलंदाजी करण्यासाठी आला. वूडच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने शानदार चौकार मारला. त्यानंतर कोहलीने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तर इतर खेळाडू देखील खूश झाले. त्यावेळी कोहलीचा संताप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तेव्हा त्याने अपशब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर भारत गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर देखील कोहलीचं नेहमीप्रमाणे आक्रमक रूप पहायला मिळालं होतं.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

राज्यात डेल्टा प्लसचा धुमाकूळ सुरु; आणखी इतक्या रुग्णांना संसर्ग

“राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे वेगळे”

#Video | माॅल्स पुन्हा सुरु, मात्र नागरिकांना पाळाव्या लागणा ‘या’ अटी

सैनिकांंना पाहताच गुलाबराव पाटलांच्या भावना जागृत, पाहा व्हिडीओ

“तुम्ही एक दोन विदेशी कंपन्या विकत घेतल्यामुळे देशहित कमी झालं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More