बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या नियुक्त्या तुमच्याच सरकारच्या काळातील…’; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजताना दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर गंभीर आरोप करत पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्डांच्या सदस्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मसुद्दर लांबे यांचे दाऊदबरोबर संबंध असल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आहे. दाऊदच्या हस्तकांचा महाविकास आघाडी सरकारमध्ये भरणा होत आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

वक्फ सदस्य लांबे आणि मोहम्मद अरशद खान यांच्यातील संभाषणाची क्लिप देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. त्यावर लांबे यांची नियुक्ती सरकारने केली नसून ते निवडणुकीने बोर्डावर निवडणून आले आहेत, असं उत्तर गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिलं आहे.

वक्फ बोर्डातील सदस्यांची नियुक्ती 31 ऑगस्ट 2019 रोजी झाली आहे. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. देवेंद्र फडणवीस सरकार होते. त्या सरकारमध्ये शिवसेना होती. मात्र, शिवसेनेला किती अधिकार होते हे आपणांस माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या काळात वक्फ बोर्डातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एवढं सगळं असताना धडधडीतपणे सांगण्यात येत आहे की, डॉ. लांबे यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली आहे. कोणी चूक केली असेल तर जरूर आरोप लावा. कोणतेही चुकीचं काम करण्यासाठी जनतेने प्रतिनिधित्व दिले नाही ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा, म्हणाले…

“मला वाटलं होतं राज ठाकरे हे करुच शकत नाही पण….”

‘काही पक्षांचे विचार एक्सपायर झाले आहेत तरी…’; भाजपचा हल्लाबोल

“… त्यानंतर नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधानपद सोडतील”

‘भाडे दिले नाही तर…’; भाडेकरुसांठी सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More