बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोरमध्ये 10 वर्षीय मुलगा केंजळ गडावरुन पडला थेट 420 फुट खोल दरीत

पुणे | पुण्यातील भोर तालुक्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. अवघ्या 10 वर्षाचा मुलगा 420 फुट खोल दरीत कोसळल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समजताच शेजारील गावातील मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी मदत करुन मुलाला बाहेर काढलं. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सासवड येथील मुलांचा ग्रुप भोरजवळील केंजळ गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. पहाटे लवकर निघाल्यानंतर सुमारे साडे आठच्या दरम्यान ते गडावर पोहोचले. यावेळी पावसाच्या वातावरणामुळे प्रचंड धुकं देखील तिथं होतं. अशातच धुक्यामध्ये रस्ता व्यवस्थित न दिसल्याने 10 वर्षाच्या मुलाचा पाय घसरला आणि तो गडावरुन 420 फुट खोल दरीत कोसळला.

संबंधित मुलाचं नाव मयंक गणेश उर्णे असं आहे. दरीत कोसळताच ग्रुपमधल्या इतर सदस्यांनी स्थानिक गावकऱ्यांशी आणि पोलिसांशी मदत मागितली. यानंतर ओहळी गावातील पाकेरेवाडी येथील ग्रामस्थ आणि युवक मदतीला धावले. हे युवक पायवाटेने झाडांचा आधार घेत मयंकजवळ पोहोचले.

दरम्यान, मयंक हा बेशुद्ध पडला होता. तसेच त्याच्या पायवर देखील गंभीर जखमा झाल्या आहेत. युवकांनी मयंकला हातात घेऊन व्यवस्थितपणे गडावरच्या पायथ्याशी आणले. या ठिकाणी वाई सातारा पोलीस देखील हजर होते. मयंकला वाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाचे उपचार घेताना रूग्णालयात आईसोबत….’; मुलीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडे रडत-रडत केली तक्रार

“जेव्हा बघावं तेव्हा तु गरोदरच असते”; ‘ही’ अभिनेत्री तिसऱ्यांदा झाली गरोदर, फोटो व्हायरल

घरच्यांनी केलं वेगळं तरी पुर्ण केली प्रेम कहाणी, रेल्वेच्या टाॅयलेटसमोर केलं प्रियकरासोबत लग्न

ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्रिपद वाटण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

भारतातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More