बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागानं अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि अजित पवार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं. आता किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवार यांची बहिण विजया पाटील यांचे पती जरंडेश्वर कारखान्यात संचालक पदावर आहेत. विजया पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विजया पाटील यांचे पती मोहन पाटील यांच्या नावे संपत्ती आहे. तुम्हीच सांगा अजित पवार यांच्यावर कारवाई का होवू नये?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

बहिणींच्या नावानं बेनामी संपत्ती करणं हे दुर्देव आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी केली आहे. जरंडेश्वरच्या भागधारकात मोहन पाटील, विजया पाटील, निता पाटील यांचं नाव आहे. मला पवारांना विचारायच या निता, मोहन आणि विजया कोण आहेत?, मला लोकांनी सांगितलं की निता आणि विजया अजित पवारांच्या बहिणी आहेत. आता पुढील खुलासा अजित पवार यांनी करावा, असं आव्हान सोमय्या यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

दरम्यान, माझ्यावर कारवाई झाली याचं वाईट वाटत नाही तर बहिणींना यामध्ये गुंतवण्यात आल्यानं आपण दु:खी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. तरी सोमय्या यांनी अजून आरोप केल्यानं आता अजित पवार काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

मोदी सरकारचा खासगीकरणाचा सपाटा सुरुच, आता विकणार ‘ही’ कंपनी

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

“…असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं”; शरद पवार भाजपवर संतापले

‘मोदी लखीमपूर हिंसाचारावार बोलत का नाहीत?’, निर्मला सीतारमन म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More