महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची दिली धमकी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हा फोन केल्याचं समोर येतं आहे.  हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आल्याचं कळतंय.

रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण

‘कई तूफानों का रुख मोड चुका हूँ’; ट्विट करत संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

छोटा मासा गळाला लागलाय, रियाच्या भावाच्या अटकेनंतर शेखर सुमन यांची प्रतिक्रिया

पुण्यात टाळेबंदी उठवण्यात घाई झाली- अजित पवार

भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या