नव्या वर्षात कार घेणार असाल तर थांबा; नाहीतर बसेल डबल फटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी अर्थात नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच डिसेंबर (December) महिन्यात काही गोष्टीत वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात अनेक जणांचे ठरलेले प्लॅन कॅन्सल झाले आहेत. अशातच अजून एक महत्त्वाच्या गोष्टीचा फटका बसणार आहे.

तुम्ही जर कार प्रेमी असाल आणि नवीन वर्षात कार घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या नवीन वर्षात आता कार घेणं अवघड होणार आहे.

रिर्झव्ह बँकेनी रेपो (Repo) दरात वाढ केली आहे. या वर्षात ही वाढ चौथ्यांदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेनी त्यांच्या EMI आणि कर्जामध्ये वाढ केली आहे. आता कर्ज घेणं देखील महाग झालं आहे.

त्यामुळेच आता कार उत्पादक कंंपन्यांनी देखील कार महाग होणार असल्याचं जाहीर केलं आहे. नवीन वर्ष उजाडण्यापूर्वीच कार कंपन्यांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये मारुती (Maruti),किया, मर्सिडीज(Mercedes),रेनाॅल्ट,ऑडी,एमजी(MG),टाटा या कंपन्यांचादेखील समावेश आहे.

या सर्व कंपन्यांच्या गाड्यांची किंमत 1 जानेवारी 2023 पासून वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

1 एप्रिल 2023 पासून उत्सर्जानाचे नवीन नियम लागू होणार आहेत. तसेच गाड्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या (Raw materials) किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे गाड्यांचे दर वाढवण्यात आल्याचं कंपनींनीसांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या