बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! येत्या 5 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होणार

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचे रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लागू करून महाराष्ट्रात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. राज्यात रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर एक मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात सेवेचा तुटवडा येणाऱ्या पाच दिवसात कमी होईल आणि पाच दिवसात मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा राज्यात उपलब्ध होणार असल्याचं स्वतः आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. त्यातच अनेक संधीसाधू लोकांनी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केल्याचंही पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर तुटवडा येत्या पाच दिवसात कमी होईल आणि ऑक्सिजनचा पुरवठाही राज्यात सुरळीत होईल असं स्पष्ट केलं आहे.

खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता नातेवाईकांची ससेहोरपळ होऊ नये, यासाठी थेट रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा देण्याचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

‘त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; अमोल कोल्हे भाजप नेत्यांवर बरसले

गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More