बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी…; पोलिस बाप-लेकीचा हृदयस्पर्शी फोटो होतोय व्हायरल!

नवी दिल्ली |  कोरोनाच्या या कठीण काळात केंद्र शासन आणि विविध राज्य सरकारं युद्ध पातळीवर जोरदार तयारी करत आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलिस तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती कोरोनाविरोधातल्या लढाईत सरकारबरोबर आहेत. सध्या पोलिसांवर प्रचंड ताण आहे. बाहेर ड्युटी करायची आणि कुटुंबियांकडे देखील लक्ष द्यायचं. असाच पोलिस-बाप लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय.

इंदोरमधल्या एका पोलिस-बाप लेकीचा फोटो व्हायरल होतो आहे. इंदोरच्या तुकोगंज पोलिस ठाण्याचे टी.आय. निर्मल श्रीनिवास हे घराबाहेर बसून जेवण करत आहेत. आणि त्यांची चिमुरडी लेक दारात उभा राहून त्यांच्याकडे पाहत आहे तसंच ते देखील तिच्याकडे पाहत असल्याचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल होत आहे.

अनेक जणांनी हा फोटो शेअर करत पोलिस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ नाही. आपण देशभक्तीचं काम करूया आणि घरातच बसूया, असं आवाहन करत आहे. पोलिस खात्यातल्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तसंच पोलिसांनी देखील हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, देशातील लॉकडाऊनमुळे सध्या पोलिसांवर प्रचंड ताण आहे. मात्र अशाही परिस्थितीत पोलीस बांधव आपलं काम निष्ठेने करत आहेत. संकटाच्या काळात हेच पोलिस बांधव तसंच डॉक्टर बांधव जनतेसाठी देवदूत ठरले आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक

परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन संपेपर्यंत ‘या’ भाजप आमदाराचा अन्नत्याग; कोरोनाच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत

अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह

‘सरकारने मला अटक करावी, मी जामीनसुद्धा घेणार नाही’; भाजप आमदाराचं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More