पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे | पिंपरी-चिंचवड शहरात भाजपला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. 

भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना भाजपला हा धक्का बसला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरीत झालेल्या, युवक मेळाव्यात निहाल यांना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

-नगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही! भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…

भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा

“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद