मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हात

मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हात

अगरताळा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर एका कार्यक्रमादरम्यान त्रिपुराच्या एका मंत्र्याने मंत्री असलेल्या महिलेला नको तिथे हाथ लावला. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन होत असताना मनोज कांती देब यांनी मंत्री असलेल्या एका महिला मंत्र्याला नको तिथे हाथ लावला.

एका महिला मंत्र्याला नको तिथे अश्लिल पद्धतीने हात लावल्यामुळे विरोधकांनी मंत्री मनोज कांती देब यांना बडतर्फ करण्याबरोबरच अटक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजप मंत्र्याविरोधात नको त्या विषयावरुन राजकारण केले जात आहे. त्या महिला मंत्र्याची तक्रार नसेल तर तुम्हाला काय अडचण आहे, असं म्हणत भाजपचे प्रवक्ते नाबेंदू भट्टाचार्य यांनी आपले मत व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

प्रियांका गांधीच्या रोड शोदरम्यान मोबाईल चोरीला, काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

-युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

-संजय काकडे आणि अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान

Google+ Linkedin