बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुडबुद्धीने करत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे, असा आरोप केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं आहे ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे की, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते  है, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही कोणाला टार्गेट करत नाहीत. लोकं आमच्या हातात पुरावे आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधन झाली आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हे क्रिमिनल सिंधिटेक आहे. कोणाला अंगावर यायचं असेल तर या. तुम्हाला त्याचं भाषेत उत्तर दिलं जाईलं, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप युती तूटल्यापासून दोन्ही पक्षातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. किरीट सोमय्या गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण देतो. पालघर येथील येऊर गावात सोमय्या यांचा मोठा प्रकल्प सुरू आहे. 260 कोटींचा हा प्रकल्प नील सोमय्याने सुरू केला असून मेधा किरीट सोमय्या या डायरेक्ट्रर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-   

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला

“योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा”

Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा”

Unlockविषयी अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत, म्हणाले…

आता मिळणार बिनव्याजी कर्ज, मोदी सरकारने आणली ‘ही’ भन्नाट योजना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More