मुंबई | राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. तरीही अद्याप काही ठिकाणी अवकाळी पावसाचा खेळ कायम असल्याचं पहायला मिळत आहे.
अवकाळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यात अवकाळी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. उष्मघातानं राज्यातील तीन लोकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेविषयी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
“राज ठाकरेंचा सगळा सिझनेबल कार्यक्रम, ते ऋतूप्रमाणे बदलणारे नेते”
“लग्न एकासोबत केलं आणि संसार दुसऱ्यासोबत, हे चांगलं नाही”
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल
सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, पाहा आजचे दर
मोठी बातमी! नवाब मलिकांना मोठा झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला
Comments are closed.