विदेश

…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

बिश्केक | कर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये चालू असलेल्या शांघाई सहकार संघटनेच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणं टाळलं आहे.

परिषदेत मेजवानीवेळी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान या दोघांचे आगमन एकाच वेळी झाले. मात्र यावेळी ही मोदींनी इम्रान खान यांना टाळलं. पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यावर पाकिस्तानाकडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचं मोदींनी सांगितलं.

दरम्यान, या परिषदेसाठी जाताना मोदींनी पाकिस्तान मार्गे जाण्याचंही टाळलं होतं. ते पाकिस्तान मार्गे न जाता कर्गिस्तान मार्गे शांघाई परिषदेच्या संमेलनाला गेले होते.

महत्वाच्या बातम्या

-तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

-राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

-राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस

-राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

-दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या