नवी दिल्ली | अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार माजला आहे. लाखो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. अशा परिस्थितीत मृत्यूदर रोखणे किंवा लोकांचा जीव वाचवणे हे अमेरिका सरकारपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसंच यावेळी त्यांनी भारताकडे मदतीची मागणी केली.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळ्या पुरवण्याची विनंती केली आहे. यावेळी ते म्हणाले की मीसुद्धा हे औषध घेऊ शकतो, मला त्याबद्दल डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.
हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा भिन्न आहे. ही एक टॅबलेट आहे जे ऑटोम्यूनसारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरला जातो, परंतु कोरोना रोखण्यासाठीही याचा उपयोग केला गेला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीने निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत-अमेरिकेच्या भागीदारीची संपूर्ण ताकद वापरण्याचे वचन दिले आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात
दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हैदोस; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली इतक्या हजारांवर
आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…
Comments are closed.