गौतमीने मार्केट केलं जाम, लवकरच दिसणार ‘या’ भूमिकेत
मुंबई | महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणून ओळखली जाते. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत अली होती. त्यानंतर तिने केलेल्या नृत्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियामुळे आजकाल कोणीही रातोरात स्टार होतं.
गौतमीच्या डान्सवर महाराष्ट्रात टिका कोली जाते मात्र सोशल मीडीयावर तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग सुद्धा वाढत चाललीये. गौतमीच्या नृत्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. गौतमीचा नृत्य पाहण्याकरीता गावखेड्यांमध्ये रेटारेटी सुद्धा झाल्याचं समोर आलं होतं.
मात्र आता गौतमी आपल्या सर्वांना एका वेगळया भूमिकेमध्ये दिसणार आहे. गौतमी एका नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. माध्यमांशी बोलत असताना तिने या बद्दलचा खुलासा केला.
तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र डान्स करताना तिच्या हावभावांमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. दरम्यान गौतमी कोणत्या सिरीजमध्ये आणि कोणत्या भूमिकेत काम करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Airtel च्या ग्राहकांना मोठा झटका!
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘ही’ नावं चर्चेत?
मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांचा अल्टिमेटम
Comments are closed.