बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ ऑलआऊट, फलंदाजी ढेपाळली!

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ढेपाळल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी ढेर झाले आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ केवळ 78 धावांवर गारद झाला. तर 11 पैकी 9 खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.

सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार विराट कोहलीचा निर्णय फेल झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्याच षटकात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने सलामवीर के.एल.राहुलला बाद केलं. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली देखील झटपट बाद झाले. या तिघांना जेम्स अँडरसनने बाद केलं. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारा व कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम अँडरसनने केला आहे.

पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, राॅबिनसनने रहाणे आणि रिषभ पंतला बाद केलं आणि भारताच्या आशा मावळल्या. एकीकडे भारतीय संघ बाद होत असताना रोहित शर्मा याने फलंदाजीची दुसरी बाजू सांभाळून ठेवली. पंरतु तो देखील 19 धावा करत बाद झाला.

दरम्यान, 11 खेळाडूंपैकी 9 खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आली नसल्यानं आता भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणारं आहे. आज या सामन्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे आता हा सामन्यात चुरस निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

आता संपलं वाट पाहणं!; नेक्सॅानपेक्षा कमी किंमतीत मिळणार टाटांची ‘ही’ नवीन SUV!

कमाल आर खान अडचणीत, मनोज वाजपेयींकडून खटला दाखल!

शांतीचा संदेश देणाऱ्या ‘MIT’मध्ये साध्वी प्रज्ञांचं वेबिनार, विद्यार्थी संघटनांचा विरोध

“राणेंना केलेली अटक योग्यच पण…”; पाहा न्यायालयानं दिलेल्या निकालात काय म्हटलंय!

“माजी मुख्यमंत्री सुज्ञान आहेत, मात्र…”; नाशिक पोलीस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More