उत्तर प्रदेश विधानसभेत विस्फोटक सापडल्यानं एकच खळबळ

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभेत विस्फोटक पावडर सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. पीईटीएन असं या विस्फोटक पावडरचं नाव असून जगातील सर्वात शक्तीशाली विस्फोटकांमध्ये तीची गणना होते.

१५० ग्रॅम वजनाची ही पावडर कुणी आणि का सदनात आणली? याचा तपास अद्याप लागू शकला नाही.

दरम्यान, ५०० ग्रॅम पीईटीएन पावडरने संपूर्ण विधानसभा उडवली जाऊ शकते त्यामुळे सरकार याप्रकरणी गंभीर असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. तसंच या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या