बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

मुंबई | विश्वचषकामध्ये जगातील सर्वात जास्त ज्या सामन्याची चाहते वाट पाहत आहे, तो भारत पाकिस्तान सामना आज होत आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकविरुद्ध विश्वचषक स्पर्धेला सुरूवात करणार  आहे. एका व्हिडीओमध्ये राहूल आणि धोनी सराव झाल्यानंतर परतत असताना एक तरूणी हा सामना हरण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर के.एल, राहुलने टी-20 प्रकारामध्ये सध्या चांगल्या फाॅर्मात आहे. राहुलने आयपीएलच्या या हंगामातही दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे के.एल.राहुलची धास्ती पाकिस्तानच्या गोलंदाजांना लागून आहे. त्यामुळे पाकिस्तानची एक तरूणी राहुलला चांगली फलंदाजी करू नकोस, असं म्हणाली आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि राहुल रविवारी सराव संपताना मैदानातून परतत असताना पाकिस्तानची पत्रकार सवेरा पासा ही धोनी आणि राहुलची शुटींग काढत होती. त्यावेळी ती मोठ्याने ओरडून म्हणाली की, प्लीज उद्या चांगला खेळू नकोस. सवेरा पासाने हे वाक्य परत परत म्हटले. मात्र तिच्या या वाक्यावर के.एल. राहुल थोडासा हसला.

दरम्यान, महेंद्र सिंग धोनी यावेळी मेन्टाॅरची भूमिका पार पाडत आहे. त्यावेळी ती म्हणाली की, ‘माही नॉट धिस मॅच प्लीज’. त्यावर धोनीने तिला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे तर माझे काम आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिल्याचं व्हि़डीओमधून दिसत आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या-

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More