बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिरगीचा झटका येऊन बेशुद्ध पडलेल्या नवरदेवाला शुद्ध येताच धू-धू धुतलं; कारण वाचून व्हाल अवाक्

पाटणा | बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात सात फेरे घेण्याआधी नवरदेवाला झटका आला आणि नवरदेव बेशुद्ध पडला. काही वेळा नंतर नवरदेवाला शुद्ध येताच नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाची बेदाम मारहाण केली.

संबंधित घटना ही बिहारधील नालंदा जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. सात फेरे घेण्याच्या तयारी चालू असताना अचानक नवरदेवाला फिट आली. नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळेच हैराण झाले. नवरदेवाला मिरगीचा झटका आल्याचा समजताच लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. नवरीकडील लोक चांगलेच संतापले. तसेच नवरदेवाकडील लोकांनी नवरदेवाचा हा आजार लपवण्याचा आरोप करत नवरीकडच्या लोकांनी लग्नास नकार दिला.

वर-वधू दोन्ही कुटुंबात वाद वाढत गेला. वाद इतका वाढला की सगळे एकमेकांना मारहाण करू लागले. नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाकडून आलेल्या पंडिताला देखाील मारहाण केली. त्यानंतर नवरदेव शुद्धीवर आला तर त्याला देखील मारहाण केली. इतकंच नाही तर नवरदेवाकडून आलेल्या सर्व पाहुण्यांना बंदी बनवण्यात आलं.

दरम्यान, नवरदेवासोबत पंडिताला मारल्याची आणि पाहुण्यांना बंदी बनवल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हा वाद शांत करण्यात आला. पण तरी पूर्णपणे वाद मिटला नव्हता. नवरीकडील लोकांनी पाहुण्यांना सोडलं. पण या गोष्टीवर अडून बसले की जोपर्यंत हुंड्याचे पैसे परत करत नाही तोपर्यंत नवरदेवाला सोडणार नाही.

थोडक्यात बातम्या-

सलमान माझे बूट व कपडे सांभाळायचा, मीच त्याला… जग्गूदादाचा मोठा खुलासा

‘तूफान तो इस शहर में अक्सर आता है’; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

सरकारची कोरोना हाताळण्याची पद्धत चुकीची, प्रसिद्ध शास्त्रज्ञानं दिला राजीनामा

वेड्या आईची वेडी माया!, लेकराला वाचवण्यासाठी गायीची विहिरीत उडी

मोदींविरोधात पोस्टर लावले, पोलिसांकडून 100 जणांना अटक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More