बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज येतेय 500च्या खाली

नागपूर | गेल्या वर्षीपासून कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्या लाटेपासूनच कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधील नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये एकूण 1 हजार 151 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नागपूरमध्ये आज दिवसभरात अवघ्या 476 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 16 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत नागपूरमध्ये एकूण 4 लाख 73 हजार 172 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 4 लाख 55 हजार 246 जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. एकेकाळी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या नागपूरमधुन आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

नागपूरमध्ये आतापर्यंत 8 हजार 854 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम हळूहळू महाराष्ट्रातील विविध भागांमधून पाहायला मिळत आहे. विविध भागांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

नितीन गडकरींच्या वाढदिवसादिवशी घरी लक्ष्मीचं आगमन, गडकरी झाले आजोबा

महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथिल होणार; मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

….. म्हणून करण जोहर पाठोपाठ शाहरूख खानच्याही चित्रपटातून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता

 रेल्वेगाडी 110 किमी ताशी वेगानं स्टेशन पार करून गेली; त्यानंतर लगेचच जमीन हादरली अन्…

धक्कादायक! भाचीलाच बंधक बनवून केला बलात्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More