बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी

नवी दिल्ली | संकटाच्या या काळात काँग्रेस पक्ष पूर्णपणे सरकारला सहकार्य करेल आणि साथ देईल. पण पंतप्रधानांनी समोर येऊन सत्य सांगितलं पाहिजे, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

चिनी सैन्याने भारतीय प्रदेशावर कसा ताबा मिळवला?, भारतीय सैनिक का शहीद झाले?, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत? याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

संकटकाळात काँग्रेसपक्ष सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केलाय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनला जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम- नरेंद्र मोदी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More