‘या’ गावात राष्ट्रवादीने केला भाजपचा सुपडासाफ

मुंबई | शिराळा तालुक्यातील चरण गावातील ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने भाजपचा सुपडासाफ केलाय. राष्ट्रवादीच्या दहा सीट निवडून आल्या, तर भाजपची एक सीट निवडून आली. विशेष म्हणजे गावचं सरपंचपदी सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे.

सोनाली नायकवडी यांनी दोन उमदेवारांचा पराभव करुन सरपंचपदी बाजी मारली. नायकवडी यांनी तानाजी करंजवडे आणि मालन पाटील यांचा पराभव केला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चरण गावचे राष्ट्रवादीचे दहा सदस्य निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

भाजपला फक्त एक सीट जिंकता आली. दोन्ही गटात जोरदार चुरस होईल असा अंदाज होता. परंतु राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

आज राज्यातील 34 जिल्ह्यातील सात हजार 135 ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका या लिटमस टेस्ट म्हणून बघितली जात होती.

सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीहा पक्षा एक नंबरचा पक्ष ठरला असून दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या-