‘अशा’ पद्धतीनं जाणून घ्या तुमचे नाव वापरून कोण सिम कार्ड वापरतय
मुंबई| दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहारांचं(Online) प्रमाण वाढत आहे. पण त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीमध्ये फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. अशातच दुसऱ्याच्या नावाचा वापर करून इतर व्यक्तीनं सीमकार्ड घेतल्याच्या काही घटना समोर येत असतात. त्यामुळं आपल्या नावानेही कोण सिम कार्ड वापरत आहे का, हे जाणून घेण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे.
सिम कार्ड(SIM Card) घेताना ओळखपत्र पुरावा म्हणून आधारकार्ड(Aadhar Card) वापरले जाते. एका आधारकार्डवर साधारण नऊ मोबाईल नंबर रजिस्टर केलेले असतात. त्यामुळं तुमच्या नावावर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच तुम्ही काही टेप्सद्वारे तुमच्या नंबरचा कोठे वापर होत आहे का, हे काही टेप्सद्वारे जाणून घेऊ शकता.
यासाठी तुम्ही गूगलवर detelecom website असं सर्च करा. यानंतर सरकारची वेबसाइट येईल, त्यावर क्लिक करा. यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सबमीट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी तुम्हाला सबमीट करावा लागेल.
वरील सांगितलेली प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या नावावर रजिस्टर असेलेल्या सीमकार्डची लिस्ट येईल. यात जर तुम्हाला असं आढळलंकी तुम्ही यातील एखादा नंबर वापरत नाही तर तुम्ही तिथं रिपोर्टही नोंदवू शकता.
रिपोर्ट नोंदवण्यासाठी तुम्हाला Action बटणावर क्लिक करावं लागेल. यानंतर तीन पर्याय दिसतील. एक म्हणजे This is not my number. दुसरा पर्याय म्हणजे Not Required. आणि तिसरा पर्याय म्हणजे Required. या तिन्हीपैकी तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
दरम्यान, ही सेवा सध्या देशातील काही राज्यांसाठीच उपलब्ध आहे. परंतु लवकरच या वेबसाइटचा वापर इतर राज्यातील नागरिकांनाही करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- आनंदाची बातमी! सोनं चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या दर
- ‘या’ धमाकेदार फीचर्समुळं इंस्टाग्राम वापरणं झालं आणखी मजेशीर
- एकनाथ शिंदेंचा बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का!
- श्रद्धा वालकर प्रकरणी पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा!
- बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान
Comments are closed.