बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”

मुंबई | भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. येत्या दोन महिन्यात भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस हे मुख्यंमंत्री असतील, असं एक मोठं व्यक्तव्य भाजपचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे. आगामी हंगामी विधिमंडळात मुख्यमंत्र्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करणार आहोत. या सरकारला पायउतार व्हावं यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं रवी राणा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

भाजपचा 5 वा उमेदवारही विजयी झाल्याने भाजपला आकाश ठेंगणं झालं आहे. भगवान हनुमानांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. रावणाची लंका जाळण्यासाठी रामभक्त आणि हनुमानभक्त आमदारांच्या रूपात अवतरले आहेत. हे आमदार महाविकास आघाडीला आधी धडा शिकवतील मग जनता धडा शिकवेल, असाही इशारा रवी राणा यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी भगवान हनुमानाचा अपमान केला. याची शिक्षा ते भोगत आहेत. आम्ही हनुमान चालिसा म्हणल्याने आम्हाला तुरूंगात डांबलं. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आता महाविकास आघाडीची उलटी गिनती सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांंना पायउतार व्हावं लागेल, असं व्यक्तव्य रवी राणा यांनी केलं.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही आमदाराच्या असंतोषचा फायदा भाजपने करून घेतला असं म्हणायला हरकत नाही. शिवसेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेना आणि काँग्रेसची मते फोडण्यात भाजपला यश आलं.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! फडणवीसांची रणनिती यशस्वी, महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला यश

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी

केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात

“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More