…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

नवी दिल्ली |   आम्ही सपा आणि बसपाशी युतीची बोलणी करू आणि त्यांनी जर युतीसाठी नकार दिला तर उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं आहे.

आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपा यांनी काँग्रेसला बाजूला सारत युतीची घोषणा केली आहे.

महाआघाडीबाबत हा त्यांचा शेवटचा निर्णय नाही. ते या निर्णयावर पुनर्विचार करतील, असंही पी. चिदंबरम म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसने अजूनही आघाडीची आशा सोडलेली नाही सध्या तरी असंच म्हणावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!

-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

Google+ Linkedin