Top News देश

बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच

लखनऊ |  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात एका गावात एक पाकिस्तानी महिला गावची सरपंच झाली आहे. विशेष म्हणजे ती सरंपच झाल्यावर ती पाकिस्तानची असल्याचं कळलं आहे.

उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. सरपंच बनण्यासाठी तिने बनावट आधारकार्ड, मतदान कार्डसुद्ध बनवलं. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.

बानो बेगम असं या महिलेचं नाव असून ती 64 वर्षाची आहे. बानो बेगम  35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाईकांकडे आली त्यानंतर तिने अख्तर अली नावाच्या स्थानिक तरूणाशी विवाह केला. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात रहात आहे पण तिला अजुनही भारतीय नागरिकत्व मिळालं नाही. त्या गावातील कुवैदन खान यांना या महिलेबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी महिलेने आधार कार्ड व इतर कागदपत्रे कशी मिळविली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”

“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात

जिओने आपल्या ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट; फुकट वापरा ‘ही’ सेवा!

क्रेटाला टक्कर देण्यासाठी MG सज्ज; येतेय ही जबरदस्त कार, पाहा लूक आणि फिचर्स

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या