Top News देश

उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदेह

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पकरिया गावात हे कुटुंब राहत होतं. दुपारी ती मुलगी शौचाला चालले असं सांगून घराबाहेर गेली. पण बराच वेळ ती मुलगी घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली आणि त्यानंतर लखीमपूर खिरी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांना त्या मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात विचित्र अवस्थेत सापडला. तिच्या डोळ्यांना जखमा दिसत होत्या आणि गळ्याला ओढणी बांधल्याचं निशाण तसेच दोन्ही पाय बांधलेले होते, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यानंतर पोलिसांनी पकरिया गावातील दोघांना सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या आरोपांखाली अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेची कारवाई एनएसए अंतर्गत करण्यात येईल, अशी माहिती लखीमपूर खिरीचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार यांनी दिलीये.

महत्वाच्या बातम्या-

पुढील तीन दिवस ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शाळा कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती

राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु करा, कारण…- रोहित पवार

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेणार पण नाही- गिरीश बापट

दोघा भावांना कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या